Kulanggad Pradakshina and Jatayu Temple

सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये सर्वांत खडतर पर्वत रांग कोणती असेल तर ती उत्तर-दक्षिण लांबलचक पसरलेली “कळसुबाई रांग”. याच रांगेतील गिरायरोहकांना नेहमीच भुरळ पडणारे खडतर पण अंत्यत देखणे असे तीन किल्ले म्हणजे अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये हे तिने किल्ले चढायला सर्वात अवघड मानले जातात.

गेल्या ३ वर्षांपासून अलंग,मदन आणि कुलंग हे किल्ले खूप वेळा पालथी घातले होते नुकताच पावसाळा संपून ऑक्टोबर महिना चालू झाला होता. सह्याद्रीच्या प्रस्तरोहकाच आणि ऑक्टोबर महिना यांच नातं जग जाहीर आहे. कधी एकदा तो विजयदशमी साजरा करतोय आणि कधी एकदा Rock Climbing करायला बाहेर कड्या कपारीत जातोय असेे भाव प्रत्येक प्रस्तरोहकांचे असतात. यावर्षी देखील विजयादशमी नेहमी प्रमाणे SGNP SLAB मध्ये जाऊन साजरा करायचा विचार होता. काही दिवस आधी अरुण सरांनी विचारले मग काय विचार विजयादशमीचा? मी पूरता गांगरुन गेलो. दरवर्षीं जिकडे जातो तिकडे जाऊया. मी सरांना आतुरतेने विचारले तुमच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय? तसे सर म्हणाले “दसऱ्याच्या नंतर जे काही करणार त्याची पाहणी करूया म्हणजे दसरा सार्थकी लागेल”, “बस्स अब तो काम हो गया” बोला सर कुठे जाऊया, दोघे असलो तरी चालेल पण आता माघार नाही. सुरज तू फक्त आंबेवाडी मधून भोरूला आपल्या बरोबर घेयाचे आहे हे विसरू नकोस.
अरुण सर मी सोहन बरोबर बोललो आहे तो पण येण्यासाठी तयार झाला आहे. आम्ही शुक्रवारी रात्री १६ ऑक्टोबर २०१५ आंबेवाडीला पोहचून भोरूच्या घरी निद्रावस्थेत गेलो पण उत्सुकता एवढी होती कि मला काही झोप लागेना . इथला संपूर्ण भाग सरांनी पिंजून काढला आहे मग बाकी काय ! त्यात सरांना विचारायची हिम्मत तर मुळीच नाही. गप्प गुमान पुटपुटलो “झोपातो नाहीतर मलाच सोडून जातील”
सकाळी सरांनी शिट्टी वाजवली. माझ्या मोबाईलच्या गजराच्या आवाजावर सर उठले पण मी तसाच झोपलो होतो. मग सर काय सोडणार होय पुढच्या १० मिनटात शिटी वाजवून उठवले. पण तरी मला जास्त झोपायला दयायचे कदाचित मी त्यांचा लाडका विद्याथी होतो.  
मी उठलो आणि डोक्यात विचार आला सर बाहेर जाऊन नजर कुठे फिरवणार का?  ते पहायला गेलो पण कदाचित सरांनी त्यांचे काम आधीच करून घेतले असेल, शेवटी न राहून मी विचारलं,पण सरांचं उत्तर आलं “तू झोपा काढ जा” 
सर्व तयारी करून आम्ही चौघे जण सज्ज झालो. जास्तीचे पाणी आणि जेवण घेऊन गावातून निघून नेहमीच्या झापा जवळ गाडी लावली. आम्ही चौघे जण चालायला तसे तरबेज होते म्हणून जरा भरभर चालत होतो चालता चालता आमची वाट हळूच कुलंगच्या दिशने वळली. जवळजवळ अर्धा टप्पा झाल्यावर आम्ही विश्रांती घेतली. तेवढ्यात भोरू उठून डाव्या घळीत शिरला तर मी लगेच त्याला विचारला “कुठली वाट शोधतो आहेस? 
अखेरीस सरांनी बॉब फोडला, आपण कुलंग प्रदक्षिणा मारून छोट्या कुलंगचा शोध घेणार आहोत.

कारण आजतागायत तिकडे कोणी गिर्यारोहक फिरकला नाही. हे ऐकून मी तर भलताच खुश झालो पण डोक्याला थोडेसे पटत नव्हते कारण सर तर दसऱ्याचा नंतरची म्हणजे rock climbing ची पाहणी करायची आहे असं बोलले होते पण हा तर ट्रेकच असणार. शेवटी भोरू ने वरुन आवाज दिला ” वरती या, फक्त घळीच्या तोंडावरती थोडी काटेरी झाडाची जाळी आहेत सर्वांनी वाकून या”

आम्ही घळ चढून वरती जातो तर काय मदन आणि कुलंगच्या वाटेवरती पोचलो अगदी नेहमीच्या कातळा जवळ (जिथे कुलंगचा कातळ चालू होतो ). खिंडीमध्ये डायरेक्ट short cut ने आम्ही पोहोचलो होतो. हा ट्रॅव्हर्स म्हणजे फक्त कारवी आणि काटेरी झाडे. त्या काटेरी झाडांनी आम्हाला मदन ते  कुलंगचा ट्रॅव्हर्स करताना जे काही फोडून काढलं आहे बस्स रे बस्स मला तर त्याची खूप धास्ती वाटायची . हळू हळू चालत आत्ता कुलंगच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो आणि तिकडे भयकंर घसारा (Scree) चालू झाला. पण ऑक्टोबर महिना असल्यामुळे मातीमध्ये ओलावा बाकी होता. आमच्या कडे Harness, Rope इत्यादी सर्व साहित्य होते पण त्याची एवढी  काही  गरज भासली नाही. तिकडून दिसणारा अलंग,मदन आणि कुलंग काही तरी वेगळेच दिसत होत. आम्ही टोकाला होतो तिथे पहिले मानवी पाऊल कदचित आमचेच असेल. दुपारचे १ किंवा २ वाजले असतील त्याच टोकवरती बसून मस्त जेवण करून घेतलं. ज्या घसारावरतून (Scree) आलो त्याच वाटेवरून मागे जाऊन दुसऱ्या बाजूला जाण्याची सोपी वाट तिथेच दिसत होती बाकी सर्व ठिकाणी कातळ आणि भयंकर खोल दरी होती. एका ठिकाणी २० फूट scree चा patch लागला. तिकडे वरती चढून आडवं चालत गेलो कि आम्ही कुलंगच्या कातळाला लागलो . ज्या दुसऱ्या बाजूला जाणार होतो तिकडचा  traverse हा थोडा मोकळाच होता त्याच कारणही तसंच होतं सह्याद्री मधला बेफाट पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तिथे कारवीला देखील तग धरून राहणे देखील अवघड होते.

इतिहास याच मातीत घडला आहे म्हणून या सह्याद्रीची सैर करणे कुणा येड्या गाभाळ्याचे काम नाही या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात.” पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे”. हि म्हण एवढी चपखल बसते कि बस्स रे बस्स वाघ म्हणजे खुद्द अरुण सावंत सर, साथीला सह्याद्रीतील वारा तर होताच आणि आम्ही बाकीचे मराठे. 
पायखालची वाट मोकळी असल्यामुळे समोरच असेलेला छोटा कुलंग राहून राहून त्याच्या प्रेमात पाडत होता पण बोलतात ना “नजर  हटी और दुर्घटना घटी ”  शेवटी काय धडपडलो. जसं जसं पुढे जात होतो तस तसे  कुलंग आणि छोटा कुलंग मध्ये काही तरी भानगड दिसत होती. उजव्या अंगाला सुळक्यासारखा काही तरी  दिसत होत थोड्याच वेळात एक कपार लागली रात्रीच्या मुक्कामासाठी खूप चांगली जागा होती. सरांना ती कपार दाखवली पण भोरू काही ऐकायलाच तयार नव्हता, आम्हाला फक्त रात्रीचा मुक्काम करून सकाळी सरळ कुलंगच्या नेहमीच्या वाटेने खाली उतरायचे होते, पण ऐकेल तो भोरू कसला. खिंडीमध्ये एक Lose Bolder Pinnacle आणि छोटा कुलंगची रॉक वॉल दिसली. जाता जाता कुलंगच्या समोरच्या बाजूचे फोटो काढून घेतले होते.

अरुण सरांना छोट्या कुलंग बदल जास्त काही माहित नव्हते म्हणून त्या वेळेला आम्ही ठरवलं, जर का कुलंगला पायवाट नसेल तर खिंडीमधली रॉक वॉल climb  करायची पण जर पायवाट असेल तर माथा गाठायचा एवढ नक्की . थोड्या वेळात अंधार पडायला सुरवात होणार होती. जेवढे जमेल तेवढे  पुढच्या अंगाला जाऊन राहूया, शेवटी आम्ही सर्व traverse ने पुढे येऊन अडचणींमध्ये मुक्कामासाठी थांबलो  . कदाचित चांगल्या ठिकाणी झोपलो असतो तर तो दिवस आणि जागा कधीच विसरून गेलो असतो. रात्रीचा मुक्काम म्हंटल कि अरुण सरांचा बेत काही वेगळाच असायचा त्यांना खिचडी भात ट्रेकला खायाला कधीच आवडायचे नाही पण मला मात्र सरांच्या हातची खिचडी खूप आवडायची. त्यादिवशी सरांनी सुक्या बोंबलाच कोरड्यास, भात आणि सकाळची कोरभर भाकरी करून खायला घातली त्यामुळे मन अगदी तृप्त होऊन गेलं.

रात्री गप्पा मारत मारत आम्ही सर्व कधी झोपून गेलो ते समजलंच नाही. सकाळी ८ वाजता आम्ही मुक्कामी जागेवरून चालायला सुरवात केली आणि अवघ्या १ तासामध्ये आम्ही कुलंगच्या नेहेमीच्या वाटेला जाऊन थडकलो आणि आम्ही सर्वानी एकच जल्लोष करून खाली उतरायला लागलो. चालता चालता राहिलेला वेळ कसा सार्थकी लावायचा ? या चर्चेला उधाण आलं.  
महाराष्ट्रतील नाशिकात रामायण घडलं असं बोलल जात म्हणून जवळपास असेलेला महाराष्टातील जटायुच मंदिर बघून जाऊया. गावात पोहोचायला पुढचे २ तास पुरेसे होते. रस्त्यावर लागलो तेव्हा एक कुरंगवाडी मधला एक मुलगा भेटला तेव्हा मी छोट्या कुलंग विषयी माहिती काढली पण त्याने छोटा कुलंगवर जाण्यास नकार दिला “तुम्हा लोकांना नाय जमायचं तिकडं वाट अडचणीची आहे “. अरुण सरांच्या मते तो मुलगा जर का एवढा बेधडक बोलतोय याचा अर्थ तो जाऊन आला आहे. पण त्याला काय माहित आपण कोण आहे. त्यामुळे साहजिकच तो हे उत्तर देणार. गावात पोचल्यावर लगेच सोहम आणि मी जवळच्या तलावामध्ये डुबक्या मारून मज्जा केली कारण आमच्या ट्रेकमध्ये असे क्षण खूप कमी मिळतात. मस्त अंघोळ करून भोरूच्या घरी जेवणाचा बेत करून निघालो. 

दुपारी ३च्या सुमारास आम्ही जटायू मंदिरच्या जवळपास असलेल्या झाडावरती एकदम मोठ्या आकाराचे वटवाघूळ पहिले ते थोडे जास्तच भयानक दिसत होते.

जटायु पक्षांच भला मोठा पुतळा समोरच दिसत होता. मंदिरांमधली जटायू आणि रामची मूर्ती देखील खूपच बोलकी आहे

जटायू रामच्या कुशीमध्ये पडलेला दिसत होता. ते सर्व पहिल्या नंतर नकळत जटायूचे रामावरील  प्रेम आणि श्रद्धा याची जाणीव आपल्याला होते.
नेहमी प्रमाणे संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये ९ च्या सुमारास सगळे सुखरूप पोहोचलो. पुढच्या काही दिवसात अरुण सर आणि आशिष म्हात्रे यांच्या मध्ये छोटा कुलंग विषयी जाण्याची चर्चा देखील झाली पण अरुण सरांना वेळेअभावी जमले नाही. थोड्या दिवसांनी Chakram Hikers team ने छोटा कुलंग आणि खिंडी मधला pinnacle ची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांची Facebook लिंक येथे देत आहे. 


https://www.facebook.com/ashishmhatre04/media_set?set=a.10205431399579896&type=3
https://www.facebook.com/vinay.y.jadhav/media_set?set=a.10209764874303678&type=3


सुरज मालुसरे – ९२२१८३१३६४